IND vs NZ – बुमराहचा विकेटचा ‘चौकार’, यशस्वी, राहुलचा जोरदार पलटवार; न्यूझीलंडमध्ये 17 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वेलिंग्टन कसोटीचा दुसरा दिवस हिंदुस्थानने गाजवला. न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक ठोकले. यशस्वी जैस्वाल याने आक्रमक, तर केएल राहुलने संयमी खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीची धार बोथट केली. जैस्वाल 85 धावा काढून बाद झाला. त्याने राहुलसोबत 130 धावांची दणदणीत सलामी दिली. दुसरीकडे राहुलनेही यशस्वीला उत्तम साथ देत अर्धशतक ठोकले.

Comments are closed.