टीम इंडिया-CSK नव्हे, मी या संघाच्या ड्रेसिंग रुममधील मीटिंगसाठी पैसे देण्यास तयार; अश्विनचं वि
आर. अश्विन इंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे: भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी क्रिकेटमधील विश्लेषणासाठी तो नेहमीच चर्चेत असतो. रविचंद्रन अश्विन त्याच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवर, अनेकदा असे मत व्यक्त करतो जे सहसा मैदानाबाहेर ऐकायला मिळत नाही. भारत आणि न्यूझीलंडमधील (Ind vs NZ 2nd ODI) पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतरही अशीच भावना दिसून आली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, भारताने एक षटक शिल्लक असताना 301 धावांचे लक्ष्य गाठले, परंतु भारतासाठी विजय सोपा नव्हता. एका क्षणी, भारताचा स्कोअर 234 वर 2 फलंदाज बाद असा होता, परंतु त्यानंतर, भारतीय संघाने लवकर विकेट्स गमावल्या आणि सामना रोमांचक झाला. शेवटी, केएल राहुलच्या संयमी फलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला. सामन्यानंतर, अश्विनने भारतीय संघापेक्षा न्यूझीलंडचे जास्त कौतुक केले.
न्यूझीलंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्यासाठी पैस देण्यास तयार- आर. अश्विन (R. Ashwin Ind vs NZ 2nd ODI)
अश्विन म्हणाला की, न्यूझीलंड संघ अतिशय “विश्लेषणात्मक” दृष्टिकोनाने खेळतो, म्हणजेच रणनीती आणि डेटा-चालित विचारसरणीने. न्यूझीलंडच्या संघ बैठकांमध्ये बसण्यासाठी आणि त्यांचे नियोजन समजून घेण्यासाठी पैसे देण्यास तयार आहे, असं अश्विन म्हणाला. तसेच न्यूझीलंडचा संघ मैदानावर ज्या पद्धतीने आपल्या योजना राबवतो ते कौतुकास्पद आहे. न्यूझीलंडमध्ये अनेक प्रमुख खेळाडूंचा अभाव आहे आणि खेळाडूंच्या तुलनेत ते अनेक संघांपेक्षा कमकुवत दिसतो. मात्र असे असूनही, शिस्त, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि सुदृढ रणनीतीमुळे ते मोठ्या संघांना कठीण स्पर्धा देऊ शकतात. न्यूझीलंड शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाही आणि म्हणूनच ते सामन्यात पुनरागमन करू शकतात असेही अश्विनने सांगितले.
आज भारत आणि न्यूझीलंडचा दुसरा वनडे सामना- (Ind vs NZ 2nd ODI)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे खेळला जाईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आता दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडसाठी हा सामना ‘करो या मरो’चा असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ- (Team India vs New Zealand)
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आयुष बदोनी.
भारतविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ- (Team India vs New Zealand)
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मिचेल हे (यष्टीरक्षक), निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जोश क्लार्कसन, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जॅक फॉल्क्स, डॅरिल मिचेल, काइल जेमिसन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), जेडेन लेनोक्स, मायकेल रे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.