आज निर्णायक सामना! भारत-न्यूझीलंड ‘करो या मरो’, कोण मारणार बाजी? प्रत्येक LIVE अपडेट्स एका क्लि

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय थेट क्रिकेट स्कोअर मराठी अपडेट : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील ‘फायनल’ सामना इंदूरमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे होळकर स्टेडियमवर आज जो संघ जिंकेल, त्याच्याच नावावर ही मालिका जाणार आहे.

भारतीय संघाने 2019 पासून घरच्या मैदानावर एकही वनडे मालिका गमावलेली नाही. तर दुसरीकडे, न्यूझीलंडला आजवर भारतात कधीही वनडे मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण सात वनडे सामने खेळले असून, सर्व सातही सामने जिंकले आहेत. म्हणजेच येथे भारताचा विजयाचा विक्रम 100 टक्के आहे, जो किवी संघासाठी नक्कीच दडपण वाढवणारा ठरू शकतो.

होळकर स्टेडियमची पिच रिपोर्ट

इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. येथे धावांचा पाऊस पडताना दिसतो. यंदाही सपाट खेळपट्टी असण्याची शक्यता असून, फलंदाजी करणे तुलनेने सोपे असेल. मात्र, नवीन चेंडूने सुरुवातीला थोडीफार स्विंग मिळू शकतो. चेंडू जुना झाला की फलंदाजांना फटके मारणे अधिक सोपे होईल. भारत-न्यूझीलंड सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर होणार आहे. हवामानाबाबत सांगायचे तर पावसाची शक्यता नाही, मात्र संध्याकाळी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

सामना कोण जिंकेल? (मॅच प्रिडिक्शन)

दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला असला, तरी आमच्या अंदाजानुसार या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. नाणेफेक महत्त्वाची ठरणार असली, तरी सामना 70-30 असा भारताच्या बाजूने झुकलेला दिसतो. आमच्या मते, तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये भारताचाच विजय होण्याची अधिक शक्यता आहे.

भारता संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), जेडेन लेनोक्स, झाचेरी फॉल्क्स, काइल जेमिसन आणि ख्रिस क्लार्क.

हे ही वाचा –

Aus vs Ind Squads : बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे अन् टी-20 संघ जाहीर, 7 वर्षांनी दिली संधी, सगळेच चक्रावले

Comments are closed.