संजूचा ओपनिंगमधून पत्ता कट! आकडेवारीच धक्कादायक, विचित्र यादीतही समावेश

भारताने टी२०मध्ये न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकली. या मालिकेतील सलग तीन सामने जिंकत यजमान संघाने त्यांचे टी२०मधील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारत मोठ्या आघाडीने तिसऱ्या सामन्यासाठी गुवाहाटीच्या मैदानावर उतरला. रविवारी (२५ जानेवारी) झालेला तो सामना भारताने तब्बल ८ विकेट्सने जिंकला. हा विजय भारताच्या उत्साहात भर टाकत असताना एका खेळाडूंचा फॉर्म मात्र संघासाठी डोकेदुखी ठरतोय.

भारताचा विकेटकीपर आणि सलामीचा फलंदाज संजू सॅमसम या मालिकेत सलग तिसऱ्यांदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो या सामन्यात तर खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याची अशी स्थिती आताच नाहीतर मागील अनेक डावांपासून तो भारतासाठी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने २०२५ पासून भारताच्या टी२० संघाच्या फलंदाजीसाठी सलामीला येताना ९ डावांमध्ये केवळ ११.५५च्या सरासरीने १०४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३३.३३ एवढाच राहिला. पाच डावांमध्ये तो दहाचा आकडा देखील पार करू शकला नाही.

एकीकडे संजूचा साथीदार अभिषेक शर्मा संघाला वादळी सुरूवात करून देत असून त्याची बॅट मात्र तिसऱ्या सामन्यातही शांत राहिली. त्याचा हा फॉर्म असाच कायम राहिला तर भारताला टी२० विश्वचषकासाठी सलामीला पर्याय शोधावा लागेल. त्याची भारताचा मुख्य विकेटकीपर-फलंदाज म्हणून २०२६च्या टी२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली आहे.

त्याचबरोबर संघाची चिंंता कमी होण्यासाठी एक कारणही आहे. इशान किशनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उत्तम खेळी करत चांगले संघपुनरागमन केले आहे. तो विश्वचषकात भारतासाठी सलामीवीर फलंदाज-विकेटकीपरसाठी योग्य पर्याय आहे.

तसेच संजूने तिसऱ्या सामन्यानंतर एक विचित्र विक्रमही आपल्या नावे केला आहे. तो टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत केएल राहुल, पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे.

संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सलामीला येताना (जानेवारी 2025पासून)

26(20),5(7),3(6),1(3),16(7),37(22),10(7),6(5),0(1).

डाव- 9, धावा- 104, सरासरी-11.55, स्ट्राईक रेट133.33

Comments are closed.