INDvsNZ: भारताचे टेंशन वाढले! डॅरिल मिचेलची पुन्हा मोठ्या खेळीकडे वाटचाल

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना इंदौर येथे (रविवार, १८ जानेवारी) खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजांनीही कर्णधार शुबमन गिलचा हा निर्णय सत्कारणी लावला. अर्शदीप सिंग याने संघात पुनरागमन केले असून पहिल्याच षटकात पाहुण्या संघाला धक्का दिला. त्याच्यानंतर हर्षित राणा यानेही दुसरी विकेट घेतली. असे असले तरीही न्यूझीलंडचा डॅरिल मिचेलचा फॉर्म मात्र कायम आहे.

दुसरी बाजू ढासळत असताना मिचेलने न्यूझीलंडची एक बाजू पकडून ठेवली आहे. त्याने या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली असून तो खेळपट्टीवर टिकून आहे. त्याने ५६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या १००च्या पुढे गेली आहे.

मिचेलने केलेले अर्धशतक हे त्याने भारताविरुद्धचे सलग चौथे वनडे अर्धशतक ठरले आहे. तसेच त्याने मागील ७ वनडे डावांमध्ये सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. तो भारतासाठी का खतरनाक आहे याचा प्रत्यय मागच्या वनडेत आलाच आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Comments are closed.