IND vs NZ: वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर; या खेळाडूला पहिल्यांदाच संधी

न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी दौऱ्यासाठी आपला वनडे आणि टी-20 संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 11 जानेवारीपासून सुरू होणार असून, या दौऱ्यात सर्वप्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत.

या मालिकेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लेफ्ट-आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर जेडन लेनॉक्सला पहिल्यांदाच वनडे संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय अनुभवी अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल याच्यावर वनडे संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार मिचेल सँटनर ग्रोइन दुखापतीमुळे वनडे मालिकेत खेळू शकणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

काइल जॅमीसन आणि मिचेल सँटनर हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा न्यूझीलंड संघात परतले आहेत. जॅमीसनला वनडे आणि टी-20 या दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान देण्यात आले आहे, तर सँटनरला केवळ टी-20 संघातच संधी मिळाली आहे. सँटनरच्या अनुपस्थितीत वनडे मालिकेत ब्रेसवेल कर्णधार म्हणून नेतृत्व करणार असून, त्याला डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिचेल, विल यंग आणि हेन्री निकोल्स यांसारख्या अनुभवी फलंदाजांची साथ लाभणार आहे.

न्यूझीलंडचा वनडे संघ:
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), अदी अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फॉल्क्स, मिच हे (यष्टिरक्षक), काइल जॅमीसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग

न्यूझीलंडचा टी-20 संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (यष्टिरक्षक), जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जॅमीसन, बेवोन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी

Comments are closed.