ना फलंदाजी, ना गोलंदाजी! 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी डोकेदुखी
संघनिवडीसाठी खेळाडूंची कामगिरी मागील सामन्यांवरून ठरवली जाते. यामुळे अनेक खेळाडूंना खराब कामगिरीमुळे बाकावर बसावे लागले आहे. यातच एका अष्टपैलूची भर पडली आहे. मागील काही वर्षांपासून आपल्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभांगामध्ये वरचढ असणारा भारताचा स्टार खेळाडू मागे पडताना दिसत आहे. तरीही संघ व्यवस्थापन त्याला संधी देत असल्याने एका नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.
रविंद्र जडेजा भारताचा विश्वासात्मक अष्टपैलू खेळाडू राहिला आहे, मात्र मागील काही मालिकांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. तो घरच्या मैदानांवर तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष कौशल्य दाखवण्यात अपयशी ठरला. एकेकाळी तो संघाच्या विजयात महत्वाची भुमिका निभावत होता. त्याच्यात संघासाठी आवशक्यता होती तेव्हा धावा रोखत विकेट काढण्यात आणि धावा करण्याची क्षमता होती, मात्र तो आता संघर्ष करताना दिसत आहे.
फिनिशरचीही भुमिका जडेजा उत्तम पार पाडत होता. मागील दहा वनडे सामन्यात त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी यांची आकडेवारी पाहिली तर त्याची कामगिरी फारच खराब राहिली आहे. यामध्ये तो केवळ 9 विकेट्सच घेऊ शकला, तर फलंदाजीही फारशी काही चांगली झाली नाही. विरोधी फलंदाजांना अडचणीत आणण्याचे कौशल्या त्याच्यात होते, आता फलंदाज सहजच धावा काढत आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले, मात्र पहिल्याच सामन्यात त्याने 9 षटकात एकही विकेट न घेता 56 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करताना केवळ 4 धावा करू शकला.
जडेजाची निराशाजनक कामगिरी त्यातच वॉशिंग्टन सुंदरची दुखापत यामुळे संघ व्यवस्थापनेसमोर अडचण निर्माण झाली आहे. सुंदरच्या जागी आयुष बदोनीची निवड करण्यात आली असूून काही प्रमाणात का होईना संघाची काळजी मिटली गेली आहे, तर दुसरीकडे अक्षर पटेल चांगली कामगिरी करत आहे. 2027 विश्वचषकासाठी संघाची तयारी सुरू असताना वरिष्ठ खेळाडूंवर त्यांचा फॉर्म कायम राखण्याची वेळ आली आहे. यातच जर जडेजाची कामगिरी अशीच निराशाजनक राहिली तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येईल. असे झाले तर युवा खेळाडूंकडेही भारताकडून खेळण्याची संधी निर्माण होतील.
Comments are closed.