दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरिक्षा, राजकोटवरची आकडेवारीच डोकेदुखी वाढवणारी

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना 14 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकत आघाडी 2-0 मालिका जिंकण्यावर यजमान संघाचे लक्ष असणार आहे. त्याआधी चाहत्यांचे मन निराश करणारी आकडेवारी समोर येत आहे. ती अशी की भारत दुसरा सामना ज्या मैदानावर खेळणार आहे त्यावर यजमानांचा विक्रम काहीसा निराशाजनक आहे.

निरंजन शाह स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकूण 4 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारताने पहिला सामना 2013मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. हा सामना भारताने केवळ 9 धावांनी गमावला होता. तर दुसरा सामना भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये आफ्रिकेचा संघ 18 धावांनी विजयी ठरला होता. 2020मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. यामध्ये यजमानांना अखेर विजयाची चव चाखायला मिळाली. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकला. 2023मध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. हा सामना मात्र भारताने 66 धावांनी गमावला.

वरील आकडेवारी पाहता भारताला 4 पैकी 3 वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही सामने भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना गमावले आहेत. तसेच बाकीचा राहिलेला एक सामना प्रथम फलंदाजी करत जिंकता होता. या सामन्यात केएल राहुल याने 52 चेंडूत 80 धावा केल्या होत्या आणि तो सामनावीर देखील ठरला होता. सध्या तो संघात असून त्याचबरोबर विराट कोहलीचा भन्नाट फॉर्ममुळे भारतला न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे.

त्याचबरोबर किवी संघ पहिला सामना अनुभवी खेळाडू केन विलियमसन, मॅट हेन्री, मिशेल सॅंटनर यांच्याशिवाय खेळला होता. तरीही त्यांनी धावांचा डोंगर उभा करत भारतासमोर अडचण निर्माण केली होती, मात्र काहीशा खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला त्याचा फायदा झाला.

Comments are closed.