दुुसऱ्या टी20 मधून अक्षर बाहेर! भारताच्या एका जागेसाठी तीन दावेदार, पाहा संभावित प्लेईंग इलेवन
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसरा सामना आज (शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या संघात बदल निश्चित असून न्यूझीलंडच्या संघात कोणते बदल होतील याकडे लक्ष असेल.
भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी२० मध्ये दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे तो दुसऱ्या टी२०मध्ये खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. तो न्यूझीलंडच्या डावात त्याचे चौथे षटक टाकण्यास आला होता, तेव्हा त्याच्या हाताचे बोट चिरले गेले यामुळे त्याने केवळ तीन चेंडू टाकले. उर्वरित षटक अभिषेक शर्माने पूर्ण केले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २३८ धावांचा पाऊस पाडला होता. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकला.
अक्षरच्या अनुपस्थितीत संघाकडे कुलदीप यादव आणि रवि बिश्नोई हे पर्याय आहेत. तसेच हर्षित राणाला देखील संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंडच्या संघात मायकल ब्रेसवेल पूर्णपणे फिट झाला तर इश सोधीला बाकावर बसावे लागेल. तसेच कायले जेमिसनच्या जागी मॅट हेन्री संघाच्या अंतिम अकरामध्ये येऊ शकतो.
रायपूरच्या मैदानावर भारताचा हा दुसराच टी२० सामना असणार आहे. येथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७४ धावसंख्येचा बचाव केला आहे.
दुसऱ्या टी२०साठी दोन्ही संभावित संघ-
भारत – सूर्यकुमार यादव (कर्ंधर), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड– मिचेल सॅंटनर (कर्णधार), टीम रॉबिनसन, डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, क्रिस्टियन क्लार्क, मॅट हेन्री किंवा कायले जेमिसन, इश सोधी किंवा मायकल ब्रेसवेल, जॅकोब डफी.
Comments are closed.