ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघात बदल, वनडेत त्रास देणाऱ्याची एंट्री

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या ठरवलेल्या संघात बदल झाला आहे. त्यांनी युवा अष्टपैलू क्रिस्टियन क्लार्कला टी२० संघात निवडले आहे. तो यामधील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाचा भाग असणार आहे.

ऍडम मिल्ने आणि मायकल ब्रेसवेल दुखापतग्रस्त असल्याने न्यूझीलंडची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे वेगवान गोलंदाज क्लार्क भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळाताना दिसेल. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे.

मिल्नेला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसए २० लीगमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ब्रेसवेलही भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त झाला. हे दोघेही न्यूझीलंडच्या टी२० विश्वचषकाच्या संघाचा भाग आहेत.

क्लर्कने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिला. त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या.

न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, क्रिस्टियन क्लर्क (पहिले तीन सामने), डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, झॅक फाउल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी.

बातमी अपडेट होत आहे.

Comments are closed.