टीम इंडियासाठी आनंदाची वार्ता! तिलक वर्मा फिट, ‘या’ सामन्यातून करणार संघपुनरागमन
भारताचा स्फोटक फलंदाज तिलक वर्मा दुखापतीतून सावरला असून तो खेळण्यास पूर्णपणे फिट आहे. यामुळे तो टी२० विश्वचषकाच्या आधीच संघाशी जोडला जाणार आहे. यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता आहे, मात्र संघ व्यवस्थापकांचे यावर वेगळेच मत आहे. त्याला स्थानिक स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती.
तिलक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात जखमी झाला होता. या स्पर्धेत तो हैद्राबादचे नेतृत्व करत होता. दुखापतीनंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. तेथे त्याची दुखापत गंभीर असल्याने समजले. पोटाच्या दुखापतीमुळे त्याला दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ आराम करण्याचा सल्ला दिला गेला.
तिलक दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला. तसेच त्याला टी२० मालिकेतूनही काही सामन्यांसाठी संघाबाहेर केले गेले. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी त्याच्याजागी श्रेयस अय्यरला संघात घेतले गेले.
दुखापतीतून सावरल्यावर तिलकने सराव सुरू केला, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले. तो बेंगलोरच्या सेंटर ऑफ एक्सिलेंस (सीओई) मध्ये मेहनत घेत आहे. त्याने टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिले, असे संघ व्यवस्थापकांचे मत आहे.
त्यामुळे तिलक न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यासाठी खेळताना दिसणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विश्वचषकात सराव सामन्यांचा त्याच्या पुढे पर्याय आहे. पुरूषांचा टी२० विश्वचषक २०२६ फेब्रुवारी ७ पासून सुरू होत आहे. यामुळे तो थेट विश्वचषकात दिसू शकतो.
तिलकने २०२५ आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनाविजयी खेळी केली होती. त्यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ६९ धावा केल्या होत्या.
Comments are closed.