IND vs NZ – 149 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! टीम इंडियाच्या धुरंधरांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. हिंदुस्थानने पहिल्या डावामध्ये धावांचा डोंगर उभारला असून न्यूझीलंडचे दोन गडी झटपट बाद केले आहेत. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या 2 बाद 119 धावा झाल्या असून यजमान अद्यापही 233 धावांनी पिछाडीवर आहे. पाचव्या दिवशी उर्वरित 8 खेळाडूंना बाद करून कसोटीला निकाल आपल्या बाजूने लावण्याच्या इराद्याने हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरेल. न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्व्हे 59, तर रचिन रविंद्र 27 धावांवर नाबाद आहे.

वेलिंग्टन कसोटीमध्ये हिंदुस्थानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत विश्वविक्रम स्थापित केला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी हिंदुस्थानने करून दाखवली. कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासामध्ये एखाद्या संघाने एका डावात पहिल्या सातही विकेट्ससाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागिदारी करण्याचा विक्रम हिंदुस्थानने आपल्या नावावर केला आहे.

Rishabh Pant – 6, 6, 6, 6, 6, 6… ‘पॉवरफूल’ शतक ठोकत ऋषभ पंतने इतिहास रचला, ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिलाच

Comments are closed.