विराटची नजर रिकी पॉटींगच्या वर्ल्ड रेकॉर्डवर! सचिनचाही 'या' लिस्टमध्ये समावेश
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा-जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा-तेव्हा तो विक्रमे मोडतो आणि बनवतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला असाच एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) इंदौर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. या सामन्यात विराटला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉटींगचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत ९३ धावांची सामनाविजयी खेळी केली होती. दुसऱ्या वनडेत मात्र तो लवकरच बाद झाला आणि भारतानेही सामना गमावला. यामुळे तिसऱ्या वनडेत भारत जिंकावा आणि विराटची फलंदाजी उत्तम व्हावी यावर लक्ष असणार आहे. या सामन्यात त्याने जर ३६ धावा जरी केल्या तर त्याला पॉटींगच्या विश्वविक्रमाला मागे टाकता येईल.
विराटने वनडेमध्ये आतापर्यंत ३१० सामन्यांत ५८. ४५च्या सरासरीने १४६७३ धावा केल्या आहेत. ज्यातील १०६९१ धावा संघाच्या विजयाच्या कामी आल्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पाहिले तर संघाच्या विजयात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या स्थानी आहे. यामध्ये त्याच्या पुढे पॉटींग असून त्याने १०७२६ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये संघाला विजय मिळवून देताना सर्वाधिक धावा क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. त्याने भारताना विजय मिळवून देताना १११५७ धावा केल्या आहेत.
संघाच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे पहिले ५ खेळाडू (वनडे)-
१. सचिन तेंडुलकर- १११५७
2. रिकी पाँटिंग- 10726
3. विराट कोहली- 10691
4. समथ जयसूर्या- 8873
5. कुमार संगकारा- 8301
Comments are closed.