Ind vs NZ: पहिल्या टी20 मध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ‘हा’ खेळाडू खेळणार तिसऱ्या क्रमांकावर
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारीला खेळवला जणार आहे. याआधी झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टी20 मालिका जिंकून भारतीय संघ दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे, पण प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? हे अजूनही निश्चित झालेलं नाही. दरम्यान या सामन्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या टी20 मालिकेआधी भारतीय संघाला 2 मोठे धक्के बसले. वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा या दोघांनाही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. या दोन्ही खेळाडूंच्या जागी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोईचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तिलक वर्मा जर संघाबाहेर झाला नसता, तर तो या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून आला असता. पण तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दौघांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.
मालिकेतील पहिल्या सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यात श्रेयस अय्यरऐवजी इशान किशनला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. रेव्हस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवने कन्फर्म केलं आहे की, इशान किशन मालिकेतील पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. इशान किशनला न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी आणि आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. यासह आयपीएल 2025 स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या कामिगिरीच्या बळावर त्याला बऱ्याच महिन्यांनी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.
Comments are closed.