VIDEO: चल जा भोसxx..अभिषेक शर्मा अन् शुभमन गिल दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले
आयएनडी वि पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने गुणतालिकेत 2 गुणांसह अव्वल स्थानही पटकावले आहे. तसेच या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला सलग दुसरा विजय ठरला.
भारत जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी पहिल्या चेंडूपासून भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला (Haris Rauf) स्लेज केले. शाहीन शाह अफ्रिदीच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार टोलावला. यावेळी शाहीन शाह अफ्रिदी अभिषेक शर्माला काहीतरी बोलला. यावर अभिषेकने देखील चल..भोस…, असं म्हणत प्रत्युत्तर दिले. यादरम्यान व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्लासिक अभिषेक शर्मा 💥
पहा #Indvpak आता लाइव्ह, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर.#Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 pic.twitter.com/horygorpgs
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 21 सप्टेंबर, 2025
या दोघांची किती भागीदारी आहे 💯#Indvpak #Abhisheksharma #शुहमंगिल pic.twitter.com/lvvhlhwwy6
– रोहान (@Bigboss_check) 21 सप्टेंबर, 2025
भारत आणि पाकिस्तानचा सामना कसा राहिला?
पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान आरामात पार केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
हस्तांदोलन नाहीच-
साखळी फेरीत झालेल्या भारत-पाक सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीसह सामना संपल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने बराच गदारोळ केला होता. त्यानंतर, भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत पाकविरूद्ध हस्तांदोलन करणार नसल्याची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, 21 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातही नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाकचा कर्णधार सलमान आगा याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तसेच सामना संपल्यानंतरही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.