पहिल्या चेंडूपासून बाचाबाची, शाहीन, हारिस नेमकं काय बोलत होते?; अभिषेक शर्माने सगळं सांगितलं!
इंडन वि पाक एशिया कप 2025 अभिषेक शर्मा: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अभिषेक शर्माने धू धू धुतलं. यानंतर पाकिस्तानचे गोलंदाज चांगलेच चवतळल्याचे दिसले.
भारत जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी पहिल्या चेंडूपासून भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला (Haris Rauf) स्लेज केले. शाहीन शाह अफ्रिदीच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार टोलावला. यावेळी शाहीन अफ्रिदी अभिषेक शर्माला काहीतरी बोलला. यावर अभिषेकने देखील प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मैदानात नेमकं काय काय घडले, याबाबत अभिषेक शर्माने सामना संपल्यानंतर सांगितले.
मैदानात नेमकं काय घडलं?
तु एवढा शांत आहे, पण मैदानातील स्वभाव तुझा खूप वेगळा आहे, असा प्रश्न अभिषेक शर्माला विचारला गेला. यावर पाकिस्तानी खेळाडू मैदानावर अशा गोष्टी बोलत होते, ज्या बोलायला नको होतं. पाकिस्तानी खेळाडू मैदानावर सतत अपशब्द वापरत होते. शुभमन आणि मला वाटले की आपण त्यांना शब्दांनी नाही, तर आपल्या फलंदाजीने उत्तर द्यावं, असं अभिषेक शर्माने सांगितले.
अभिषेक शर्मा अनावश्यक आक्रमकतेला कॉल करतात:
“कोणत्याही कारणास्तव ते आमच्याकडे येत होते, मला ते अजिबात आवडले नाही, म्हणूनच मी त्यांच्या मागे गेलो”. pic.twitter.com/foybxw3ggw
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 21 सप्टेंबर, 2025
अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी-
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.
प्रकाशाच्या वेगाने 0-50 पासून गेले – अभिषेक, काय एक खेळाडू 🔥
पहा #Dpworldasiacup2025 – लाइव्ह वर #Sonyliv आणि #Sonsportsnetwork टीव्ही चॅनेल 📺 #ASIACUP #Indvpak pic.twitter.com/mjtxi7npi3
– सोनी लिव्ह (@सोनी लाइफ) 21 सप्टेंबर, 2025
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.