टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळावा लागतोय?; अखेर बीसीसीआयने सांगितले कारण

आयएनडी वि पाक एशिया कप 2025 वर बीसीसीआय: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) आज (14 सप्टेंबर) दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता भारतविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकल्याने आजचा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा आजचा सामना रद्द करावा, अशी मागणी भारतातील काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येत असल्याने विरोधकांकडून केंद्र सरकारला लक्ष्य देखील केले जातेय. याचदरम्यान, बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. टीम इंडियाला पाकिस्तानशी सामना का खेळावा लागतोय?, यामागील कारण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (BCCI Secretary Devajit Saikia) यांनी सांगितलं आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले? (आयएनडी वि पीएके सामन्यावरील बीसीसीआय))

देवजीत सैकिया म्हणाले की, मला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरतील. भारताला अशा देशासोबत खेळावे लागते ज्याच्याशी आपले चांगले संबंध नाहीत. परंतु बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. म्हणूनच आपण भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यांना नकार देऊ शकत नाही, असं देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले.

माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले? (What Did Anurag Thakur say?)

काही आठवड्यांपूर्वी, भारत सरकारने पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत एक नवीन धोरण लागू केले होते. त्याचा संदर्भ देत, माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, टीम इंडियाला आशिया चषक किंवा विश्वचषक सारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य झाले आहे. परंतु भारत पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही.

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे- (Team India Dressing Room)

भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळावं की नाही? असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटूंसमोरही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची चर्चा झाली. व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पाहा, असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वीची प्रशिक्षक किंवा कर्णधाराची पत्रकार परिषदही झालेली नाहीय.

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक- (ग्रुप स्टेज)- (Asia Cup 2025 Full Schedule, Match Dates, Venues)

9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई
11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई
18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान

सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-

20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
21 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 2
23 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 2
24 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 2
25 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 2
26 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 1
28 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना

https://www.youtube.com/watch?v=FSFHM8EXNFQ

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गौतम गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, भारत-पाक सामना रद्द होणार?

आणखी वाचा

Comments are closed.