फखर जमान OUT होता की Not Out?, संजू सॅमसनने कॅच पकडलेली की नाही?; व्हिडीओचा नवीन अँगल आला समोर

फखर झमान संजू सॅमसन कॅच इंड. पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यातील पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर फखर झमान (Fakhar Zaman) याच्या विकेटची चर्चा रंगली आहे.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गोलंदाजीवर फखर झमानचा संजू सॅमसनने (Sanju Samson) झेल घेतला होता. मात्र हा झेल पूर्णपणे संजू सॅमसनने घेतला नव्हता. चेंडू जमीनीला लागून एक टप्पा झेल संजू सॅमसनने पकडल्याचा दावा पाकिस्तानच्या खेळाडूंकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान संजू सॅमसनच्या झेलचा नवीन अँगल समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजू सॅमसनने योग्य झेल घेतल्याचं दिसून येतंय.

नेमकं प्रकरण काय? (Fakhar Zaman Sanju Samson Catch)

हार्दिक पांड्याच्या षटकातील तिसरा चेंडू फखरच्या बॅटच्या कडेला लागला. संजू सॅमसनने झेल घेतला. कॅचबद्दल मैदानावरील पंचांना शंका होती. त्यामुळे त्यांनी निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. पंचांनी दोन किंवा तीन रिप्ले तपासले आणि ठरवले की चेंडू संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये आहे. चेंडू जमिनीला स्पर्श केलेला नव्हता. म्हणून, फखरला बाद घोषित करण्यात आले. फखर जमानला त्याला बाद घोषित करण्यात आल्याचा विश्वासच बसत नव्हता. फखर जमान नाराज होऊन पॅव्हेलियनकडे परतला.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय- (Team India Win Over Pakistan)

पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान आरामात पार केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दरम्यान, पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर फखर जमानने 15, सईम अयुबने 21, मोहम्मद नवाजने 21, सलमान आगाने 17 आणि फहीम अश्रफने 20 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने 2 विकेट्स पटकावल्या. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाल्या.

संबंधित बातमी:

इंडियन वि पॅक असिया कप आता हॅरिस रौतेनीही दिव्चलान, मला जमिनीवर माहित नाही, जमिनीत गाठ,

Ind vs Pak Asia Cup 2025: चल जा भोसxx..अभिषेक अन् शुभमन दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.