पहिले साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; आता हारिस रौफनेही डिवचलं, नको नको ते मैदानात केलं, VIDEO

आयएनडी वि पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकतीमुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन केली. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच दुसऱ्या डावात म्हणजेच भारत जेव्हा फलंदाजी करत होता, त्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची अॅक्शन करुन दाखवत आहे.

साहिबजादा फरहानचा व्हिडीओ-

हारिस रौफचा व्हिडीओ-


अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी-

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.

भारताचा 6 विकेट्सने दणदणीत विजय-

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. साहिबजादा फरहान यानं 58 धावा केल्या.भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. सॅम अयूब 21 धावा, मोहम्मद नवाझ 21 आणि फहीम शरीफनं 20  धावा करत पाकिस्तानला 171 धावांपर्यंत पोहोचवलं. यानंतर भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या 74 धावा, शुभमन गिल 47 धावा यामुळं भारताचा विजय सोपा झाला. या दोघांच्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांनी भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. तिलक वर्मानं 30 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025: चल जा भोसxx..अभिषेक अन् शुभमन दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.