सगळी वाट लावली, मोहसीन नक्वीला पाकिस्तानमधूनही विरोध; मंत्रिपदही जाण्याची शक्यता, काय घडलं?
एशिया कप ट्रॉफी इंड. वि पाक मोहसिन नकवी: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) 28 सप्टेंबर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. याआधी साखळी सामन्यात आणि नंतर सुपर-4 च्या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानला लोळवलं. त्यामुळे आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा भारताविरुद्ध पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एसीसीचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तथा पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. या सर्व घटनेनंतर मोहसीन नक्वीसह पाकिस्तानचा जगभारत अपमान झाला. त्यामुळे आता पाकिस्तानमधूनच मोहसीन नक्वीला विरोध सुरु झाला आहे.
इम्रान खानच्या पक्षाच्या, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते मुनीस इलाहीने मोहसीन नक्वीवर पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच मोहसीन नक्वीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदावरुनही हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात हिंमत असेल तर मोहसीन नक्वीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हानही मुनीस इलाहीने दिलं आहे. त्यामुळे आता मोहसीन नक्वीला पदावरुन हटवणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अंतिम सामन्यात काय घडलं, नेमकं प्रकरण काय? (Asia Cup Trophy Controversy)
पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही, यामागील कारण आता समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. “पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले. दरम्यान, पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.
संबंधित बातमी:
भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती
आणखी वाचा
Comments are closed.