गोळीबार करुन मॅच थांबवा, तेव्हाच भारताविरुद्ध जिंकू; पाकिस्तानात LIVE TV वर तज्ज्ञाचं ‘अतिरेकी’
भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 एशिया कप 2025: भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना आणि त्यात वाद होणार नाही, असं कधी होणार का? आशिया कप 2025 मध्येही ही परंपरा कायम राहिली. ग्रुप स्टेजमध्ये जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध भिडला, तेव्हा सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यावरून खळबळ उडाली होती. पाकिस्तानने याबाबत आयसीसी आणि एसीसीकडे तक्रारही केली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
ग्रुप स्टेजमधला वाद अजून थंडावलेलाच नव्हता आणि सुपर-4 मध्ये पुन्हा नवा वाद पेटला. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत तुफानी फटकेबाजी केली. या धडाकेबाज खेळामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ संतापला आणि भारतीय खेळाडूंना उचकवू लागला. मात्र, रऊफला अभिषेक शर्माने फक्त बॅटनेच नव्हे तर शब्दांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र पाकिस्तानच्या एका टीव्ही टॉक शोमध्ये पॅनेलिस्टने केलेली टिप्पणी सर्व मर्यादा ओलांडल्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली.
पाकिस्तानात LIVE TV वर तज्ज्ञाचं ‘अतिरेकी’ विश्लेषण
या व्हायरल व्हिडिओमध्ये, अँकरने एक धक्कादायक प्रश्न विचारला, “सर, जर येथून आता आपण जिंकू शकतो का?” यावर, एका पॅनेलच्या सदस्याने हसून उत्तर दिले, “मला वाटते की आपण येथे काही मुलांना फायरिंग करायला लावावी, आणि सामना संपवा कारण आपल्याला माहित आहे की आपण हरणार आहे.”
थेट टीव्हीवर निर्लज्ज पाकिस्तानी
सामना इतका वाईट रीतीने गमावला की ते उघडपणे मुलांना गोळीबार करण्यासाठी आणि खेळ थांबविण्याबद्दल बोलण्याबद्दल बोलतात.ही पाकिस्तानची खरी मानसिकता आहे – क्रिकेटमध्येही दहशत!
आरटी आणि जागतिक पाकिस्तानची वास्तविकता दर्शवा.#Indvpak #INDVSPAK2025 #ASIACUP pic.twitter.com/sokeyxuw2p– केशर_सिन्डिकेट (@सॅफ्रॉन्सइंडकेट) 21 सप्टेंबर, 2025
या ‘अतिरेकी’ विश्लेषण वक्तव्यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. या शोमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली आणि कामरान अकमल हेही उपस्थित होते. मैदानावरील खराब कामगिरीमुळे आधीच टीकेचा भडिमार झेलणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटवर या घटनेने आणखी कलंक लावला आहे.
शाहीन आफ्रिदी अन् हारिस रऊफ भारतीय खेळाडूंशी भिडले
सामन्यादरम्यानही खेळाडूंमध्ये तणाव वाढताना दिसला. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिस रऊफ यांनी भारतीय फलंदाजांना उचकावण्याचा प्रयत्न केला. मात्र अंपायरांनी मध्ये पडून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यातच हारिस रऊफच्या फायटर जेट शैलीतील सेलिब्रेशनवरही जोरदार टीका झाली.
सामन्याबद्दल बोलायचं झाले तर, रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 चेंडू बाकी असताना 6 विकेट्सने पराभव केला. सध्या सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय होता. भारताने 18.5 षटकांत 4 विकेट्स गमावून 174 धावा करून 172 धावांचे लक्ष्य गाठले. अभिषेक शर्मा आणि गिल यांनी भारतीय संघाला शानदार आणि वेगवान सुरुवात दिली.
या दोघांनी 9.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. 28 चेंडूंत 47 धावा काढल्यानंतर गिल बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही, तो 3 चेंडूंत खाते न काढता बाद झाला. अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकावले, 39 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. अभिषेकच्या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. शेवटी तिलक वर्मा 30 धावांवर आणि हार्दिक 7 धावांवर नाबाद राहिले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.