पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; शुभमन गिलच्या हाताला दुखापत, वेदनेनं विव्हळला
आयएनडी वि पाक एशिया कप 2025: ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. आज दुबईत भारत आणि पाकिस्तानमध्ये हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. मात्र या सामन्याआधी भारताला धक्का बसला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याला सराव करताना दुखापत झाली आहे. शुभमन गिलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. शुभमन गिलला दुखापत होताच भारतीय संघाचे फिजिओने तात्काळ उपचार केले. चेंडू हाताला लागताच शुभमन गिलला वेदना झाल्या. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी शुभमन गिलशी संवाद साधला. शुभमन गिलची दुखापत किती गंभीर आहे, तो आज होणारा पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार की नाही?, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एका वर्षानंतर शुभमन गिलचं टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन-
एका वर्षानंतर शुभमन गिलचं टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झालं आहे. आशिया चषकातील युएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलने 20 धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दबाबत बोलायचे झाले तर, त्याने 22 सामन्यात 598 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
आजचा सामना कोण जिंकणार?
भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानचा आजचा सामना महत्त्वाचा आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे या सामन्याची हजारो तिकिटे अजूनही विक्रीविना उपलब्ध असल्याची माहिती आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकल्याने आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष लागल्या. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना सुरू होईल.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल हे राज्य पातळीपासून ते भारतासाठी एकत्र सुरू झाले. 🇮🇳pic.twitter.com/3mx4ubiyqw
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 13 सप्टेंबर, 2025
भारताचा संपूर्ण संघ (India Full Squad): सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Full Squad): सलमान आगा (कर्नाधर), अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक), मोहम्मद नवाज, मोहम्मद नवाज, सॅहबदहद, शीबदाद सूफन शाह शाह.
https://www.youtube.com/watch?v=FSFHM8EXNFQ
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.