अभिषेक तू हे काय केलं? हार्दिक पांड्याने धरले डोके, पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच षटकात नेमकं काय
India VS Pakistan Asia Cup 2025 Super 4 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आशिया कप 2025 च्या सुपर फोर फेरीत सामना रंगला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय संघात दोन बदल केले असून जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांना हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांच्या जागी संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. हसन नवाज आणि खुशदिल शाह या सामन्यात खेळत नाहीत. दरम्यान, सामन्याच्या पहिल्याच षटकात अभिषेक शर्माकडून मोठी चुक झाली.
अभिषेक तू हे काय केलं? पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याने धरले डोके
झाले असे की, पाकिस्तानने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आणि असून साहिबजादा फरहान आणि फखर जमा ओपनिंगसाठी मैदानात उतरले आहेत. भारताकडून गोलंदाजीसाठी हार्दिक पांड्याने नवीन चेंडू हातात घेतला. हार्दिकचा पहिलीच चेंडू साहिबजादाच्या हातावर लागली, त्यामुळे लगेच फिजिओला मैदानावर बोलवावे लागले. पण नंतर अभिषेक शर्माने साहिबजादा फरहानचा झेल सोडला आणि त्याला जीवनदान मिळाले. भारताला पहिल्याच षटकात विकेट घेण्याची संधी होती, परंतु अभिषेक झेल पकडू शकला नाही. त्यावेळी फरहान खाता न उघडताच खेळत होता, मात्र नशिबाने तो वाचला आणि हार्दिक पांड्याने डोके धरले.
🚨 अभिषेक शर्माने आशिया कप 2025 च्या सुपर चौकारांमध्ये साहिबजाद फरहानचा झेल सोडला. #Asiacup2025 #Indvpak pic.twitter.com/dd96kd5cus
– आयसीसी एशिया क्रिकेट (@iccasiacricket) 21 सप्टेंबर, 2025
हार्दिक पांड्याने दिला भारताला पहिला ब्रेकथ्रू
तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानला आऊट केले. संजू सॅमसनने चांगला झेल घेतला. फखर आणि साहिबजादा फरहानने पाकिस्तानला जलद सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, परंतु हार्दिकने फखरला बाद करून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. नऊ चेंडूत तीन चौकारांसह 15 धावा काढून फखर बाद झाला.
टीम इंडियाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, शुभमान गिल, संजू शमसन, सूर्य कुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रेट बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवती.
पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 : सॅम अयुब, साहिबजादा फरहान, फखर झमान, सलमान आगा, हुसेन तालत, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस राउफ, अब्रार अहमद.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.