भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वी दुबईने कडक नियम अन् कायदे केले लागू; आता मैदानात…


एशिया कप अंतिम 2025 इंड. वि पीएके: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) आज (28 सप्टेंबर) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final Asia Cup 2025) संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी आशिया चषकमध्ये झालेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघा बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्याआधी दुबई पोलिसांनी काही नियम लागू केले आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan Dubai) हायव्होल्टेज सामन्याच्या पार्श्वभूमीवर, दुबई पोलिसांनी कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या आहेत. दुबई इव्हेंट्स सिक्युरिटी कमिटी (ESC) ने स्टेडियममध्ये सुरक्षा प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. प्रेक्षकांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सामना सुरू होण्याच्या किमान तीन तास आधी स्टेडियममध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच स्टेडियममधून एकदा बाहेर पडल्यानंतर, पुन्हा प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

स्टेडियममध्ये अनेक वस्तूंवर बंदी- (Many items banned in the stadium)

स्टेडियममध्ये अनेक वस्तूंवर बंदी आहे, ज्यामध्ये फटाके, लेसर पॉइंटर्स, शस्त्रे, सेल्फी स्टिक आणि अनधिकृत व्यावसायिक छायाचित्रण उपकरणे यांचा समावेश आहे. हिंसाचार किंवा वांशिक अपशब्द यासारख्या कोणत्याही सार्वजनिक सुरक्षेच्या उल्लंघनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यूएईच्या कायद्यानुसार, या गुन्ह्यांमध्ये मोठा दंड आणि तुरुंगवास आहे. अधिकाऱ्यांनी सर्व चाहत्यांना खेळाच्या भावनेचा आदर करण्याचे आणि सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण राखण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दुबईची खेळपट्टी आणि अंतिम सामना (IND vs PAK Pitch Report Asia Cup 2025 Final)

आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात ही पहिलाच वेळ आहे, जेव्हा भारत-पाकिस्तान अंतिम सामना होते आहे. दुबईची पिच फलंदाज आणि गोलंदाज, दोघांनाही साथ देऊ शकते. चाहत्यांची अपेक्षा आहे की अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे स्टार खेळाडू आपली छाप नक्कीच उमटवतील.

भारत संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Ind Probable XI)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Pak Probable XI)

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फखर झमान, हरीस रौफ, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यश्तार रक्षक), मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान, सॅम आयुब, शाहिन शाह आफ्रिदी.

संबंधित बातमी:

आयएनडी वि पीओके: लाइव्ह लाइफ, इंडिया, भारत?; व्हॅम्स अ‍ॅग्रामेनेस अक्रामा अक्रम म्हणाले!

आणखी वाचा

Comments are closed.