भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं


शोएब अख्टर इंड वि पाक एशिया कप अंतिम 2025: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया चषकातील जेतेपदाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (Ind vs Pak Asia Cup 2025) दारुण पराभव केला. भारताचा डाव सुरुवातीच्या काही षटकांत डगमगला होता. परंतु तिलक वर्माच्या (Tilak Verma) जबरदस्त खेळीनं भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भारताने 5 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने (Shoaib Akhter) ने पाकिस्तान संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पाकिस्तानच्या पराभवानंतर, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhter Ind vs Pak) संघ व्यवस्थापनावर संतापला. शोएब अख्तर म्हणाला की, दुर्दैवाने, ही संघाची समस्या नाही. मधल्या फळीची समस्या व्यवस्थापनाची चूक आहे, जी योग्य खेळाडूंना संधी देत नाहीय.  मी म्हणेन की हे मूर्खपणाचे कोचिंग आहे. असे शब्द वापरल्याबद्दल मी माफी मागतो, पण हे खरंच मूर्खपणाचे कोचिंग आहे. हसन नवाज आणि सलमान मिर्झा यांसारखे सामना जिंकवणारे खेळाडू पाकिस्तानच्या संघात असताना त्यांना संधी दिली नाही. आता थोडं कठीण झालंय. मी खूप निराश आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.

पाकिस्तानची आक्रमक सुरुवात, पण शेवटी डाव गडगडला- (India vs Pakistan Asia Cup Final)

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांचा पहिला गडी 84 धावांवर गेला, साहिबजादा फरहान 57 (38) धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन 46(35) तर सैम अयूब 14(11) धावा करून बाद झाले. उरलेल्या फलंदाजांत तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रऊफ 6 धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.

भारताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय- (Team India Over Pakistan)

147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.

फायनलनंतर ट्रॉफीवरुन राडा- (Asia Cup Trophy Controversy)

आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले. भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नक्वी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता. यासगळ्या प्रकरणावर आता बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया (BCCI React On Team India Trophy Denied) आली आहे.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलनंतर दुबईत राडा; नरेंद्र मोदी म्हणाले, निकाल तोच…

आणखी वाचा

Comments are closed.