पाकिस्तान धापा टाकत फायनलमध्ये पोहोचताच गौतम गंभीरचं तीन शब्दांचं ट्विट, म्हणाला…


आयएनडी वि पाक एशिया कप फायनल: पाकिस्तानी क्रिकेट संघाने गुरुवारी आशिया चषकाच्या सुपर-4 मधील सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान (आयएनडी वि पीएके) या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार आहे. पाकिस्तानी संघाने काल बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर (गौतम गार्बीर) यांनी एक ट्विट केले. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतम गंभीरने या ट्विटमध्ये,अंतिम फेरीत' असे कॅप्शन लिहून टीम इंडियाचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आपल्या खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी कोणत्याही चर्चा आणि वादाकडे लक्ष न देता फक्त त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. अंतिम सामन्यात भारतीय संघाला (टीम इंडिया) पराभूत करण्यासाठी पाकिस्तानला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघावर दडपण आणण्यात यश मिळाले तरच पाकिस्तान आशिया चषक जिंकू शकतो, असे माईक हेसन यांनी म्हटले. त्यामुळे आता येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात काय घडणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (एशिया कप अंतिम सामना 2025)

भारतीय संघाने आतापर्यंत एकूण आठवेळा आशिया चषक जिंकला आहे. 1984, 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018, 2023 या वर्षी भारतीय संघ जिंकला होता. यापैकी सातवेळा एकदिवसीय आणि एकदा टी-20 प्रकारात भारताने विजय मिळवला होता. तर पाकिस्तानी संघाने आतापर्यंत 2000 आणि 2012 साली अशा दोनवेळेस आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. यंदा आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमनेसामने आले होते. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला सहजपणे धुळ चारली होती. मात्र, आता अंतिम सामन्यात पाकिस्तानी आपला खेळ उंचावत भारतीय संघाला धक्का देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारतीय संघाने दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड चांगलेच चवताळले होते. पाकिस्तानने याविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती. मात्र, भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिला होता. या सगळ्या घडामोडींमुळे भारत-पाक सामना हा नेहमीपेक्षा हायव्होल्टेज ठरणार, यात शंका नाही.https://www.youtube.com/watch?v=QHOA9XMBP4U

आणखी वाचा

भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका? सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार का?

पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये जाताच प्रशिक्षकांनी फतवा काढला, म्हणाले, ‘भारताला हरवायचं असेल…’

आणखी वाचा

Comments are closed.