आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं?


भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक अंतिम 2025: भारत–पाकिस्तान आशिया कप फायनल सुरू झाली नाही आणि मैदानावरचा नाट्यपूर्ण ड्रामा शिगेला पोहोचला आहे. पहिल्यांदाच असं घडलं की, टॉसच्या वेळी दोन–दोन ब्रॉडकास्टर मैदानावर दिसले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची मुलाखत माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी घेतली, तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला प्रश्न विचारण्यासाठी पाकिस्तानचा माजी दिग्गज वकार यूनूस हजर होता. यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डची डावपेचबाजी स्पष्ट दिसून आली.

आशिया कप फायनल टॉस वेळीही ड्रामा! दोन ब्रॉडकास्टर अन्…

याआधी सुपर-4 सामन्यात दोन्ही कर्णधारांना एकाच ब्रॉडकास्टरने प्रश्न विचारले होते. मात्र, फायनलच्या आधीच तणावाचं वातावरण तापलं असून, पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषदचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आपल्या संघाला भारताविरुद्ध “जे करायचं ते करा, मी पाहतो” असं खुले आव्हान दिलं होतं. त्यानंतरच टॉसदरम्यान हा नवा वाद समोर आला.

वादांनी भरलेला आशिया कप 2025

14 सप्टेंबरला भारताकडून झालेल्या पराभवानंतर सलमान आगा हँडशेक वादाच्या निषेधार्थ पत्रकार परिषदेला गैरहजर राहिला होता. सुपर-4 सामन्यापूर्वी तर त्याने मीडियाशी संवाद साधणंच टाळलं. दुसऱ्या पराभवानंतर जरी तो पत्रकार परिषदेत आला तरी भारतीय पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधीच नाकारली गेली. पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनीही वाद पेटवण्याचा प्रयत्न केला.

फायनलचा थरार आणखी रंगतदार

टॉसच्या वेळी दोन ब्रॉडकास्टरांचं हे अनोखं दृश्य हाय-वोल्टेज फायनलला आणखी रंगतदार आणि रोमांचक बनवत आहे. भारत–पाकिस्तानचा हा संघर्ष फक्त मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही तापलेला दिसतोय.

हार्दिक पांड्या बाहेर, पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग-11 मध्ये 3 मोठे बदल

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळणार नाही. भारताने तीन बदल केले. हार्दिकची जागा रिंकू सिंगने घेतली. दरम्यान, अर्शदीप सिंगची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आणि हर्षित राणाची जागा शिवम दुबेने घेतली. या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये पाकिस्तानने कोणतेही बदल केलेले नाहीत.

पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 : साहिबजादा फरहान, फखर झमान, सॅम अयूब, सलमान आघा (कर्नाधर), हुसेन तालत, मोहम्मद हरीस (यशर), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहिन आफ्रिदी, हरीस रफ, अब्रार अहमद.

भारतीय संघाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

आणखी वाचा

Comments are closed.