सूर्यकुमार यादव फायनलसाठी संघात दोन बदल करणार; पाहा भारत अन् पाकिस्तानची संभाव्य Playing XI


इंडन वि पाक इलेव्हन अंतिम आशिया कप 2025 खेळत आहे: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final Asia Cup 2025) संघात आशिया चषकाचा (Asia Cup Final 2025) आज (28 सप्टेंबर) अंतिम सामना रंगणार आहे. याआधी आशिया चषकमध्ये झालेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघा बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारताच्या संघात काही बदल होतील. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे पुन्हा संघात परततील. तर पाकिस्तान प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल करणार नाही.

भारत संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Ind Probable XI)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Pak Probable XI)

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फखर झमान, हरीस रौफ, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यश्तार रक्षक), मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान, सॅम आयुब, शाहिन शाह आफ्रिदी.

अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल? (Ind vs Pak Pitch Report)

भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दुबईची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. चेंडू जुना होत असताना फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात, तर आकडेवारीवरून असे दिसून येते की धावांचा पाठलाग करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे कोणताही संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल.

भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना सामना कधी आणि कुठे होणार? (What time will the IND vs PAK final start?)

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होईल, तर टॉस संध्याकाळी 7.30 वाजता होईल. सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाईल, जे आधीपासूनच दोन्ही संघांच्या ऐतिहासिक भिडंतीचे साक्षीदार राहिले आहे.

भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना कुठे पाहता येईल लाईव्ह? (Where will the IND vs PAK final be live telecast and streamed?)

भारत आणि पाकिस्तानचा हाय-वोल्टेज सामना चाहत्यांना Sony Sports Network वर थेट पाहता येईल. तर डिजिटल प्रेक्षकांसाठी Sony LIV आणि FanCode अॅप वर लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध असेल.

संबंधित बातमी:

आयएनडी वि पीओके: लाइव्ह लाइफ, इंडिया, भारत?; व्हॅम्स अ‍ॅग्रामेनेस अक्रामा अक्रम म्हणाले!

IND vs PAK Asia Cup Final 2025: भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वी दुबईने कडक नियम अन् कायदे केले लागू;आता मैदानात…

आणखी वाचा

Comments are closed.