काही दिवसांआधी सूर्यकुमारने सांगितले, आम्ही स्वीकारणार नाही; आता नकवी म्हणाले, मी ट्रॉफी देण्या


आयएनडी वि पीएके अंतिम आशिया कप 2025: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final Asia Cup 2025) संघात आशिया चषकाचा (Asia Cup Final 2025) अंतिम सामना रंगणार आहे. याआधी आशिया चषकमध्ये झालेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात कोणता संघा बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नकवीने (Mohsin Naqvi) प्रतिक्रिया दिली आहे.

आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान आणि भारत (Ind vs Pak Final) अंतिम सामन्यात भिडतील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आशिया चषकातील आजच्या अंतिम सामन्याबाबत मोहसीन नकवीने (Mohsin Naqvi) उत्साह व्यक्त केला आहे. यंदाचा आशियाई चषक क्रिकेटमधील उत्कृष्टता आणि प्रतिभेचे एक भव्य प्रदर्शन आहे. चाहत्यांचा उत्साह, आशियाई संघांची स्पर्धात्मक भावना आणि मैदानावरील अविश्वसनीय कामगिरी यामुळे ही खरोखरच एक संस्मरणीय स्पर्धा बनली आहे, असं मत  मोहसीन नकवीने व्यक्त केलं. तसेच मी एक उत्तम अंतिम सामना पाहण्यास उत्सुक आहे आणि विजेत्यांना ट्रॉफी सोपवण्यास उत्सुक आहे, असं विधानही मोहसीन नकवीने केलं आहे.

मोहसीन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने दिलाय नकार- (India refuses to accept trophy from Mohsin Naqvi)

सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद पाकिस्तानचे मोहसीन नकवीकडे आहे. जर कोणत्याही संघाने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यास मोहसीन नकवीकडून ट्रॉफी दिली जाईल. हे सगळं पाहता सूर्यकुमार यादवने आम्ही मोहसीन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतल्याचं सांगण्यात येत होतं. भारताने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यास मोहसीन नकवी यांच्याकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं मत सूर्यकुमार यादवने आशियाई क्रिकेट परिषदकडे व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती.

भारत संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Ind Probable XI)

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग 11- (Pak Probable XI)

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फखर झमान, हरीस रौफ, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यश्तार रक्षक), मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान, सॅम आयुब, शाहिन शाह आफ्रिदी.

संबंधित बातमी:

आयएनडी वि पीओके: लाइव्ह लाइफ, इंडिया, भारत?; व्हॅम्स अ‍ॅग्रामेनेस अ‍ॅग्रामेनेस लेजला सांगतील!

IND vs PAK Asia Cup Final 2025: भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्यापूर्वी दुबईने कडक नियम अन् कायदे केले लागू;आता मैदानात…

आणखी वाचा

Comments are closed.