पाकिस्तानच्या कर्णधाराचा माजोरडेपणा, पुरस्कार सर्वांदेखत फेकला, नेमकं काय घडलं?
आयएनडी वि पाक अंतिम आशिया कप: आशिया चषक स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) एकावेळी अशक्यप्राय वाटत असलेला विजय प्राप्त केला. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी संघातील कोणत्याही सदस्याशी हात मिळवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यात मैदानात आणि मैदानाबाहेर वादांची मालिका सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर कालच्या अंतिम सामन्यातही अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याचा मुजोरडेपणा सर्वांच्या लक्षात राहिला. भारताने आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा हरवूनही पाकिस्तानचा ताठा जरादेखील कमी झाला नसल्याचे दिसून आले.
भारताने हा सामना जिंकल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सुरु झाला. पाकिस्तानी संघ तासभर उशीरा मैदानात आल्याने या सोहळ्याला उशीर झाला. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला व्यासपीठावर बोलवण्यात आले. आशिया कप स्पर्धेतील उपविजेता संघ म्हणून पाकिस्तानी कर्णधाराकडे 75 हजार डॉलर्सचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश स्वीकारताना सलमान आगा याने हसतमुखाने छायाचित्र काढून घेतले. मात्र, त्यानंतर मागे वळून काही अंतर चालत जात सलमान आगा याने हा धनादेश थेट व्यासपीठाच्या बाहेर भिरकावून दिला. एरवी कोणतेही खेळाडू पारितोषिकाचा चेक स्वीकारल्यानंतर स्टेजच्या बाजूला ठेवून देतात. मात्र, पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याची धनादेश थेट भिरकावून देण्याची कृती अनेकांना रुचलेली नाही. त्यानंतर सलमान आगा व्यासपीठावरुन उतरत हसतहसत तिथून निघून गेला. सलमान आगा याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून भारतीय क्रिकेटरसिक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
Team India: भारतीय संघाचा पीसीबीच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय संघाने काल दुबईच्या रिंग ऑफ फायर स्टेडियममध्ये दिमाखाता आशिया चषकावर नाव कोरले. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघाने आशिया कप स्वीकारण्यास नकार दिला. आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या सोहळ्याचे सूत्रसंचालक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला. आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. मात्र, ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले.
https://www.youtube.com/watch?v=Kj2dyfoxpo4
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.