INDvsPAK: सूर्याने कुलदीपवर वटारळे डोळे? हार्दिकही दिसला रागात, VIDEO व्हायरल

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विक्रमी विजय मिळवला. त्यामुळे मैदानावर सामना संपल्यावर भारतीय खेळाडू जल्लोष करताना दिसले. त्यामध्ये मात्र एक क्षण असा दिसला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आनंदाच्या या क्षणी हार्दिक पांड्या कुलदीप यादवला रागावताना दिसला, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याच्याकडे रागाने पाहिले. कुलदीपने नक्की काय केले ज्यामुळे हार्दिक आणि सूर्यकुमार दोघेही त्याच्यावर एवढे चिडले?
सूर्यकुमारने कुलदीपवर का डोळे वटारले? हार्दिकही त्याच्यावर चिढलेला दिसला. यामागचे नेमके कारण कदाचित कुलदीपने सोडलेला झेल असेल, असा अंदाज लावला जात आहे. पाकिस्तानच्या १८व्या षटकात हार्दिकने गोलंदाजी केली. त्यातील दुसऱ्या चेंडूवर भारताला विकेट घेण्याची संधी होती, मात्र कुलदीपने ती सोडली.
हार्दिकने शाहिन शाह आफ्रिदीला तो चेंडू टाकला आणि त्यावर आफ्रिदीने मोठा शॉट खेळला. तो चेंडू सीमारेषेपार गेला आणि त्यावर पाकिस्तानला सहा धावा मिळाल्या. तो चेंडू झेलण्याची सोपी संधी लॉग ऑनवर उभ्या असलेल्या कुलदीपने घालवली. त्यानंतर हार्दिकने त्याच्याकडे रागाने पाहत काहीतरी बडबडला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने उस्मान तारिकला त्रिफळाचीत केले आणि सामना संपवला.
सामना संपल्यावरही हार्दिक आणि सूर्यकुमारच्या डोक्यातून कुलदीपने केलेली चूक मात्र काही गेली नाही. याचाच प्रत्यय त्या दोघांच्या चेहऱ्याच्या भावनांवरून दिसला. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारताने पाकिस्तानला टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावांच्या फरकाने पराभूत केले. हा सामना पाकिस्तानने ६१ धावांनी गमावला. त्यामुळे त्यांची स्पर्धेतील जागा टिकवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे महत्वाचे आहे.
क्षेत्ररक्षणात कुलदीपने चूक केली असली, तरी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ३ षटकात १४ धावा देत एक विकेट घेतली. त्याचबरोबर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात खेळताना विकेट्स घेण्यात सातत्य कायम राखले आहे.
कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत वनडे आणि टी२० मिळून एकुण ९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये प्रत्येक सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ज्यामध्ये त्याने एका साममन्यात ४ विकेट्स आणि एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. ind vs pak hardik pandya and suryakumar yadav gets angry on kuldeep yadav icc t20 world Cup 2026 video viral
Comments are closed.