IND vs PAK: हारिस रौफच्या हरकतीवर भारतीय प्रशिक्षकाची प्रतिक्रिया; 'आम्ही बॅटनं उत्तर….'
आशिया कप 2025 मधील सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेटने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या संघाकडून मैदानावर भरपूर नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळल्यानंतर काही खेळाडूंनी हातमिळवणी टाळल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड सतत नाट्यमय वृत्ती दाखवत आहेत.
सुपर-४ सामन्यातही हे दृश्य दिसून आले, जेव्हा पाकिस्तानचा संघ सामना हरत होता, तेव्हा वेगवान गोलंदाज हारिस रौफ स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांकडे सतत अपमानजनक इशारे करताना दिसला. यावर भारतीय टीमच्या असिस्टंट कोच रेयान टेन डोएशे यांनी प्रतिक्रिया दिली.
आशिया कप 2025 मध्ये भारताचे पुढील सामना सुपर 4 मध्ये बांगलादेशविरुद्ध 24 सप्टेंबरला दुबईतील मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सहायक कोच रेयान टेन डोएशे यांनी हारिस रौफच्या भारतविरुद्धच्या अपमानजनक इशार्यांविषयी विचारले असता ते म्हणाले, “माझ्या मते आम्ही पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. पाकिस्तानी गोलंदाजाच्या वर्तनामुळे किंवा सामन्यातील काही शब्दांमुळे आपला आत्मसंयम गमावणे सोपे झाले असते. पण आमच्या खेळाडूंनी आपले लक्ष पूर्णपणे सामन्यावर ठेऊन मैदानावर फलंदाजीने उत्तर दिले. मला खूप आनंद आहे की आमच्या खेळाडूंनी या स्पर्धेत स्वतःला उत्तम प्रकारे सांभाळले.”
रेयान टेन डोएशे म्हणाले, “स्थिती लक्षात घेतल्यास समजून येते की काही खेळाडू असे वर्तन का करतात आणि ते काय दाखवू इच्छित आहेत. मी अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माला विशेष कौतुक देऊ इच्छितो. त्यांनी पाकिस्तानच्या वर्तनात न फसता सामन्यावर पूर्ण लक्ष ठेवले आणि संघाला विजय मिळवून दिला.”
Comments are closed.