भारताचा पाकिस्तानविरुद्ध शेवटचा टी20 पराभव आशिया कपमध्येच झाला होता, आमने-सामने लढतींची आकडेवारी घ्या जाणून

दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया कप 2026 चा नववा सामना आज (शनिवार, 5 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांची टी20 मधील समोरा-समोरची कामगिरी पाहिली, तर हे दोन्ही संघ 17 वेळा भिडले आहेत. यामध्ये 14 सामने भारताने जिंकले असून पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानने भारताचा टी20 मध्ये शेवटी पराभव 2022 च्या आशिया कपमध्ये केला होता. त्यानंतर खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये भारतानेच बाजी मारली आहे.
टी20 मध्ये भारत आणि पाकिस्तान सर्वप्रथम 2009 च्या टी20 विश्वचषकादरम्यान समोरा-समोर आले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 75 धावसंख्येवर सर्वबाद केले होते आणि तो सामना 5 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 2010 च्या टी20 विश्वचषकातही पराभूत केले होते.
पाकिस्तानने भारताविरुद्ध पहिल्या टी20 विजयाची चव 2012 च्या विश्वचषकात चाखली. गॉलमध्ये झालेला तो सामना पाकिस्तानने केवळ एका धावेने जिंकला होता. त्यानंतर भारताने विजयाची हॅट्ट्रीक केली.
भारताविरुद्ध पाकिस्तानला दुसरा विजय 2016 मध्ये मिळाला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाचा तो सामना पाकिस्ताने डकवर्थ लुईस स्टर्न पद्धतीने 2 धावांनी जिंकला होता. तसेच पाकिस्तानला भारताविरुद्ध तिसरा विजय 2022 च्या आशिया कपमध्ये मिळाला होता. तो सामना पाकिस्तानने 13 धावांन जिंकला होता.
पाकिस्तानने भारताविरुद्ध मिळवलेल्या तीन विजयांवरून स्पष्ट होते की, त्यांना शेजारच्या देशाला हरवण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली आहे. (IND vs PAK head to head T20I records women Asia Cup 2026)
Comments are closed.