वादळी खेळणाऱ्या ईशान किशनला ‘ती’ चूक नडली, शतक हुकलं अन् पाकिस्तानला हायसं वाटलं, पाहा Video
इशान किशन इंड विरुद्ध पाक T20 विश्वचषक 2026 : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा ईशान किशन नावाचं वादळ घोंगावायला लागतं, तेव्हा समोरचा गोलंदाज कोण आहे यानं काहीच फरक पडत नाही. पाकिस्तान विरुद्ध आजच्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. पण, दुर्दैवानं हे वादळ जितक्या वेगाने आलं, तितक्याच अनपेक्षितपणे शांत झालं. शतकाच्या उंबरठ्यावर असताना ईशानने केलेली एक छोटीशी चूक त्याला आणि टीम इंडियाला भारी पडली आहे.
अभिषेक शर्मा फ्लॉप, पण ईशान किशनचा तांडव
कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा महासंग्राम रंगात आला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध आपले खातेही उघडू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला.
उदात्त धक्कादायक! 🔥
🎥 इशान किशनने काही शैलीत पन्नास पूर्ण केले 👏
अपडेट्स ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/x4RK92sjmJ
— BCCI (@BCCI) 23 जानेवारी 2026
धावांचा पाऊस आणि चौफेर फटकेबाजी
सामन्याच्या सुरुवातीपासूनच ईशान किशन अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसत होता. त्याने मैदानाचा कोणताही कोपरा सोडला नाही. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची स्फोटक खेळी करत त्याने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाचे कंबरडे मोडले होते. या खेळीत त्याने 10 खणखणीत चौकार आणि 3 षटकार खेचत प्रेक्षकांचा पैसा वसूल केला.
सईम अयुबचा ‘तो’ चेंडू अन् घात झाला!
पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर ईशान आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असं वाटत होतं की, ही जोडी आज भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत सहज घेऊन जाईल. पण डावाचं नववं षटक सुरू होतं. सईम अयुब गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ईशानने थोडी घाई केली. तो चेंडू खेळण्यासाठी थोडा मागे सरकला, पण त्याचा हाच पवित्रा घातकी ठरला. सईमने त्याला जाळ्यात पकडलं आणि ईशान किशन बाद झाला.
इशान किशन 77 धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती आणि सामन्यावर आधीच प्रभाव टाकला होता. #IndvsPak2026 #INDvPAK #क्रिकेट #ishankishan # प्रतिस्पर्धी डोक्कनसह एकत्र लढतात #अर्थ वेडिंग भाग 4 #Ingfah31 प्रतिकार करण्यासाठी खूप मसालेदार आहे. pic.twitter.com/zgy5Ay57GB
— सचिन परिहार (@cricketnewsh) 15 फेब्रुवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.