आकाशात काळे ढग, अन्…. कोलंबोतील आता हवामान आहे तरी कसं?, मोठी अपडेट आली समोर

भारत विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह अपडेट T20 वर्ल्ड कप 2026 मराठीत: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणार आहे. स्पर्धेची दमदार सुरुवात केल्यानंतर दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. गतविजेता भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेवर विजय मिळवत केली आणि त्यानंतर नामिबियावर तब्बल 93 धावांनी दणदणीत मात केली.

दुसरीकडे, पाकिस्तानला नेदरलँड्सविरुद्ध सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी रोमांचक विजय मिळवत सामन्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अमेरिकेविरुद्धही त्यांनी सहज विजय संपादन करत आत्मविश्वास उंचावला आहे. दोन्ही संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने हा सामना अत्यंत रंगतदार आणि थरारक होण्याची चिन्हे आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने तब्बल 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ 3 विजय मिळवता आले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय मिळवले होते.

सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा हा दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघानेही या स्पर्धेत सलग दोन विजय नोंदवले आहेत. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (Indian squad for T20 World Cup 2026) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ (Pakistan squad for T20 World Cup 2026) : सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.

Comments are closed.