पाकिस्तानच्या ‘त्या’ खेळाडूची टीम इंडिया पद्धतशीर जिरवणार, बाहेर बसून अश्विनचा मोठा प्लॅन

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये येत्या रविवारी श्रीलंकेतील कोलंबोत आमने सामने येणार आहेत. 15 फेब्रुवारीला  दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी उस्मान तारिकचं नाव चर्चेत आहेत. उस्मान तारिकची गोलंदाजी शैलीवरुन वाद सुरु आहेत. कारण, उस्मान तारिक छोटा रन अप घेतल्यानंतर थांबतो आणि त्यानंतर उभं राहून गोलंदाजी करतो. उस्मान तारिकच्या गोलंदाजी शैलीमुळं  त्याच्या पुढे अमेरिकेचे फलंदाज टिकू शकले नव्हते. भारताचे फलंदाज देखील त्याच्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीत,असा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर. अश्विन यानं टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे.

आर. अश्विन काय म्हणाला?

रविचंद्रन अश्विन यानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलं की मला एक गोष्ट पाहायला आवडेल. कोण असं धाडस दाखवेल का? जर बॉल फेकण्यापूर्वी तारिकनं त्याच्या हात थांबवला,तर समोरुन बाजूला हटणं हा फलंदाजाचा अधिकार आहे. फलंदाज सांगू शकेल की बॉल केव्हा येणार हे माहिती नाही, यामुळं हटलो. यामुळं पंचांना अधिक त्रास होईल, असं आर. अश्विन म्हणाला.

अश्विन पुढं म्हणाला की यामुळं पंचासमोर प्रश्न निर्माण होईल की इशारा किंवा समज कोणाला द्यायची, फलंदाजाला की गोलंदाजाला. रविचंद्रन अश्विन म्हणाला की अशा प्रकरणांमध्ये पहिली वॉर्निंग गोलंदाजांना दिली जाते.

रविचंद्रन अश्विन पुढं म्हणाला की, फलंदाज वारंवार हटले तर उस्मान तारिक वर दबाव निर्माण होईल. यामुळं उस्मान तारिकवर दबाव वाढेल आणि त्याला गोलंदाजी शैली बदलावी लागेल. उस्मान तारिकला गोलंदाजी शैली बदलावी लागल्यास पाकिस्तानचं ट्रम्प कार्ड झिरो ठरु शकेल.

दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत सध्या अ गटात पहिल्या स्थानावर आहे. भारतानं आशिया कपमध्ये पाकिस्तानला सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. यावेळी भारत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप पुन्हा जिंकण्याच्या इराद्यानं खेळत आहे.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.