तीन झेल सुटले अन् पाकिस्तानने जसप्रीत बुमराहला धू-धू धुतला, नावावर लज्जास्पद रेकॉर्ड! सुपर-4 सा
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 : आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात भारताच्या खराब फील्डिंगचा पाकिस्ताननं पुरेपूर फायदा घेतला. तीन झेल सुटले आणि त्यावर साहिबजादा फरहानच्या (58 धावा) अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
लक्ष्य सेट आहे! आपल्यावर, टीम इंडिया 👊
पहा #Indvpak आता लाइव्ह, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर.#Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 pic.twitter.com/sjkdhymmyo
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 21 सप्टेंबर, 2025
तीन झेल सुटले अन् पाकिस्तानने जसप्रीत बुमराहला धू-धू धुतला
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानं नेहमीप्रमाणे पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगासोबत हस्तांदोलन केलं नाही. पण भारताला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मानं थर्ड मॅनवर फरहानचा झेल सोडला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सलग दोन झेल सुटले.
याचा फायदा घेत दुसऱ्या षटकात फखर जमानं बुमराहवर सलग दोन चौकार ठोकले. पण तिसऱ्या षटकात हार्दिक पंड्याच्या चेंडूवर संजू सॅमसनने फखरचा झेल टिपला. फखर 9 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावांवर बाद झाला. पण जीवनदान मिळालेला फरहान मात्र तूफानी फटकेबाजी करत होता. त्याने बुमराहचाही समाचार घेतला.
शेतात सर्वकाही सोडत आहे 💪
पहा #Indvpak आता लाइव्ह, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर.#Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 pic.twitter.com/cgahgiilqh
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 21 सप्टेंबर, 2025
फरहाननं 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर फायरिंग स्टाईल सेलिब्रेशन केले. शिवम दुबेनं सैम अयूब (32) आणि नंतर स्वतः फरहानलाच (58) बाद करत भारताला परत सामन्यात आणलं. त्यानंतर कुलदीपनं हसनैन तलत (10) ला बाद केलं. पण शेवटच्या 5 षटकांत पाकिस्ताननं तब्बल 52 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर फहीम अशरफनं हार्दिकवर षटकार ठोकत नाबाद 20 धावा जोडल्या. सलमान अली आगानंही 13 चेंडूत 17* धावा काढल्या.
बुमराहचा लाजिरवाणा विक्रम…
जसप्रीत बुमराहला ओमानविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. आशिया कप सुपर फोरमध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम इलेव्हनमध्ये परतला. पण, बुमराहने त्याच्या पुनरागमन सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम रचला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं 4 षटकांत 45 धावा दिल्या. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध बुमराहच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात महागडा पॉवरप्ले स्पेल ठरला. याआधी कधीच त्यानं एका स्पेलमध्ये 40 धावांपेक्षा जास्त दिल्या नव्हत्या. बुमराह पाकिस्तानविरुद्ध निष्प्रभ ठरला, ज्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर सहज धावा करता आल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.