‘टीम इंडियाची चीटिंग, नाहीतर ते जिंकलेच नसते…’ वसीम अक्रमचा भारतावर गंभीर आरोप, उडाली खळबळ

वसीम अक्राम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कप 2025 मधील भारत–पाकिस्तान सुपर फोरचा सामना नेहमीप्रमाणेच थरारक ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या हाय-व्होल्टेज लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत आणखी एक दणदणीत विजय नोंदवला. मात्र, भारत–पाकिस्तानचा सामना खेळला जाईल आणि त्यात वाद होणार नाही, असे कधी झालेच नाही. सलामीवीर फखर जमानच्या विकेटवरून आता वाद पेटला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) याने भारतीय संघावर चीटिंगचा गंभीर आरोप केला आहे.

फखर जमानच्या विकेटवरून वाद पेटला, नेमकं काय घडलं?

खरंतर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला पहिला धक्का बसला. जेव्हा सलामीवीर फखर झमान बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद पेटला. पंचांनी फखरला बाद घोषित केले, परंतु नेहमीप्रमाणे पाकिस्तान रडायला लागला. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि समालोचक वकार युनूस आणि वसीम अक्रम यांना पंचांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास नव्हता.

ही घटना तिसऱ्या षटकात घडली. हार्दिक पंड्याच्या षटकातील तिसरा चेंडू फखरच्या बॅटच्या कडेला लागला. संजू सॅमसनने झेल घेतला. कॅचबद्दल मैदानावरील पंचांना शंका होती. त्यामुळे त्यांनी निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. पंचांनी दोन किंवा तीन रिप्ले तपासले आणि ठरवले की चेंडू संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये आहे. चेंडू जमिनीला स्पर्श केलेला नव्हता. म्हणून, फखरला बाद घोषित करण्यात आले.

फखर झमान रागावले …

फखर जमानला त्याला बाद घोषित करण्यात आल्याचा विश्वासच बसत नव्हता. तो नाराज होऊन पॅव्हेलियनकडे परत जाऊ लागला. त्यानंतर त्याने रागाने त्याच्या बॅटने त्याच्या पॅडवर मारले. त्यानंतर स्क्रीनवर कोच माइक हेसन दिसला आणि तोही या निर्णयाशी सहमत नसल्याचे दिसून आले. या वेळी पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम कॉमेंट्री बॉक्समध्ये होता.

पाकिस्तान दिग्गज संतापले, भारतावर केले गंभीर आरोप

वसीम अक्रम (Wasim Akram) याने भारतीय संघावर चीटिंगचा गंभीर आरोप केला आहे. अक्रमने संताप व्यक्त करत सनसनाटी गंभीर आरोप केला, तो म्हणाला की, “जेव्हा साइड अँगल उपलब्ध नसतो, तेव्हा फलंदाजाला शंकेचा फायदा दिला गेला पाहिजे. भारत हा संघ चीटिंगशिवाय कधीच जिंकू शकत नाही.”

वकार युनूस काय म्हणाला?

तिसऱ्या पंचाचा निर्णय पाहिल्यानंतर तो म्हणाला, मला खात्री नाही की चेंडू खऱ्या अर्थाने सॅमसनपर्यंत पोहोचला होता. असं  वाटत होतं की चेंडू सॅमसनच्या ग्लोव्हजपर्यंत पोहोचण्यापूर्वी थोडासा उडाला होता. फखर इतका आश्चर्यचकित होण्याचे हेच मुख्य कारण आहे आणि तो अगदी बरोबर होता.

आणखी वाचा

Comments are closed.