भारताचा पाकिस्तानवर विराट विजय, टीम इंडियाच्या विजयाची प्रमुख कारणं एका क्लिकवर
आशिया चषक संघाने पाकिस्तानला पराभूत केले दुबई: आशिया कपमधील अ गटात आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनी 127 धावांचं आव्हान सहज पार केलं. भारताच्या गोलंदाजांनी प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानला 9 बाद 127 वर रोखलं. यानंतर अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानवर सहजपणे विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. तर, कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं दमदार नाबाद 47 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं षटकार मारत संघाला 7 विकेटनं विजय मिळवून दिला.
भारताच्या विजयाची प्रमुख कारणं (Team India Victory Reasons)
हार्दिक पांड्या- जसप्रीत बुमराहची सरस सुरुवात
भारताचा ऑलराऊंडर आणि अनुभवी खेळाडू हार्दिक पांड्या यानं पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज सॅम अयुबला बाद केलं. हार्दिक पांड्यानं 3 ओव्हरमध्ये 34 धावा देत 1 विकेट घेतली. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. त्यानं मोहम्मद हॅरिसला बाद केलं. त्यामुळं पाकिस्तानचा संघ सुरुवातीपासून दबावात आला. बुमराहनं पाकिस्तानच्या दोन विकेट घेतल्या.
कुलदीप यादवसमोर पाकिस्तानची मधली फळी नतमस्तक
टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवनं पाकिस्तानला तीन धक्के दिले. कुलदीप यादवनं 40 धावांची खेळी करणाऱ्या साहिबजादा फरहानला बाद केलं. यानंतर हसन नवाझ आणि मोहम्मद नवाझ या दोघांना देखील बाद केलं. यामुळं पाकिस्तानची अवस्था 6 बाद 64 अशी झाली होती.
हे जादूगारांना एक पत्र बनवायचे होते
टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल यानं पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या. त्यानं पाकिस्तानच्या फखर जमान आणि कॅप्टन सलमान आगाला बाद केलं.
अभिषेक शर्माची पुन्हा तुफानी सुरुवात
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. शुभमन गिल 10 धावा करुन बाद झाला. तर अभिषेक शर्मानं पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीची धुलाई केली. अभिषेक शर्मानं त्याला दोन षटकार मारले. अभिषेक शर्मानं 2 षटकार आणि 4 चौकारासह 13 बॉलमध्ये 31 धावा केल्या.
सूर्यकुमार यादव-टिळक वर्माची सहभाग
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताच्या डावाची जबाबदारी सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला. तिलक वर्मा 31 धावा करुन बाद झाला. पाकिस्तानच्या सॅम अयबूनं शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माला बाद केलं.
भारताच्या गोलंदाजांच्या दमदार माऱ्यापुढं मोठी धावसंख्या उभारण्याचा आत्मविश्वास पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगाला महागात पडला. त्यांचा संघ 20 ओव्हरमध्ये केवळ 127 धावा करु शकला.
आणखी वाचा
Comments are closed.