शुभमन गिल अन् शाहीन आफ्रिदी मैदानात भिडले, अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर दाखवली जागा, पाहा Vi
प्रकाशन गिल वि शारही आफ्रिका: भारत-पाकिस्तान सामन्यात शुभमन गिल आणि शाहीन आफ्रिदी (Shubman Gill And Shaheen Afridi) यांच्यात प्रचंड तणावाचं वातावरण दिसलं. पण पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाची बोलती भारतीय जोडीने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने अक्षरशः बंद केली. शाहीन फक्त रागाने पेटून निघाला, पण भारतीय युवा खेळाडूंनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडून त्याला उत्तर दिले. नेमकं घडलं काय? जाणून घेऊया….
शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार (अभिषेक शर्मा पहिला बॉल सहा शाहीन आफ्रिदी व्हिडिओ व्हायरल झाला आहे))
अभिषेक शर्मा जेव्हा क्रीजवर आला तेव्हा शाहीनने बाऊन्सर टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण डावखुऱ्या अभिषेकने थाटात पुल शॉट खेळत पहिल्याच चेंडूवर चेंडू सीमारेषेबाहेर टोलावला. शाहीन आफ्रिदीला त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेण्यासाठी ओळखला जातो, परंतु अभिषेकने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
क्लासिक अभिषेक शर्मा 💥
पहा #Indvpak आता लाइव्ह, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर.#Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 pic.twitter.com/horygorpgs
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 21 सप्टेंबर, 2025
गिलवर भडकला शाहीन
अभिषेककडून षटकार खाल्ल्यानंतर शाहीन बिथरला आणि पुढच्या षटकात शुभमन गिलवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. पण गिलने शांत डोक्याने त्याच्या चतुर्थ आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारत उत्तर दिलं. शाहीन गिलला काहीतरी बोलताना दिसला, मात्र गिलने बाउंड्रीकडे बोट दाखवत त्याला सुनावलं. अगदी 1996 मध्ये आमिर सोहेलने वेंकटेश प्रसादसमोर केलेल्या इशाऱ्याची आठवण या क्षणी झाली.
शुबमन शोमध्ये आपले स्वागत आहे, हबीबी! 🤩
पहा #Indvpak आता लाइव्ह, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर.#Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 | @Shubmangill pic.twitter.com/na77whbxlc
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 21 सप्टेंबर, 2025
पाकिस्तान गोलंदाजांची धूलाई
यानंतर गिल आणि अभिषेकने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धूलाई केली. पॉवरप्लेमध्ये फक्त 28 चेंडूत भारताने 50 धावांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, सर्वात कमी चेंडूत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 षटकारांचा टप्पा गाठण्याचा विक्रमही अभिषेक शर्माने आपल्या नावे केला. त्याने फक्त 331 चेंडूत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या एविन लुईसकडे होता. भारताकडून सूर्यकुमार यादवने 510 चेंडूत 50 षटकार मारले होते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.