U19 Asia Cup: IND vs PAK सामना किती वाजता सुरू होणार? येथे पाहा थेट प्रक्षेपण
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप 2025 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना आज, रविवार 21 डिसेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सकाळी 10 वाजता होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
या स्पर्धेत याआधीही भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानला मात देत आशिया कपच्या विजेतेपदावर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर पाकिस्तानने बांगलादेशवर मात करून अंतिम सामना गाठला.
हा अंतिम सामना दुबई येथील ICC अकॅडमी मैदानावर खेळवला जाणार आहे. सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. तसेच मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहण्यासाठी सोनी LIV अॅपवर थेट स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
भारतीय संघाची कमान आयुष म्हात्रेच्या हातात असून, त्याच्यासोबत वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, नमन पुष्पक, डी. दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन आणि आरोन जॉर्ज यांचा संघात समावेश आहे.
पाकिस्तान संघाचे नेतृत्व फरहान यूसुफ करत असून उस्मान खान उपकर्णधार आहे. त्याच्या संघात अब्दुल सुभान, अहमद हुसैन, अली हसन बलूच, अली रजा, दानियाल अली खान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), हुजैफा अहसान, मोमिन कमर, मोहम्मद सैयाम, मोहम्मद शयान, निकब शफीक, समीर मिन्हास आणि मोहम्मद हुजैफा यांचा समावेश आहे.
Comments are closed.