सामन्याच्या पहिल्याच चेंडूत 10 धावा, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया फलंदाजी करत असताना काय घड


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी वनडे : रायपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची सुरूवात धमाकेदार पद्धतीने झाली. टीम इंडियाने अगदी पहिल्याच षटकात आफ्रिकन गोलंदाजांना धक्का दिला. भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. दक्षिण आफ्रिकेसाठी चेंडू हातात घेऊन नांद्रे बर्गर आला, पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूत त्याने 10 धावा दिल्या.

पहिल्याच चेंडूत 10 धावा, नेमकं काय घडलं?

खरंतर, जैस्वालने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत भारतीय दणका दाखवला. यानंतर लगेचच बर्गरने पुन्हा वाइड टाकला, भारताला एक-दोन नव्हे तर थेट पाच धावा मिळाल्या. त्यात पुन्हा एक वाइड मिळाल्याने केवळ एका चेंडूत 10 धावा भारतीय संघाच्या खात्यात जमा झाल्या. या आक्रमक सुरुवातीमुळे आफ्रिकन गोलंदाजांचा तोलच गेला. षटकाचा शेवटही जैस्वालने चौकाराने केला आणि पहिल्या 6 चेंडूतच भारतीय संघाने 14 धावा करत चांगली सुरुवात केली.

टीम इंडियाने कोणताही बदल न करता मैदानात, टेम्बा बावुमाचे पुनरागमन

या सामन्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. रांची येथील संघ रायपूरमध्ये खेळेल. दरम्यान, टेम्बा बावुमा मागील सामन्यात न खेळता दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला आहे. भारताने पुन्हा एकदा टॉस गमावला. भारतीय कर्णधार टॉस जिंकण्यात अपयशी ठरण्याची ही सलग 20 वी वेळ आहे.

एकदिवसीय सामन्यांचा विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आतापर्यंत 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 41 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 51 सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघ भारतीय भूमीवर 33 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने 19 आणि दक्षिण आफ्रिकेने 14 वेळा विजय मिळवला आहे. 2006 पासून, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने एकमेकांविरुद्ध 10 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी पाच जिंकल्या आहेत.

टीम इंडियाची Playing XI – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिकन असोसिएशन खेळत आहे xi – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, मॅथ्यू ब्रिएत्झके, टोनी डी जिओर्गी, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

हे ही वाचा –

Team India : टीम इंडियात पडली फूट? कोहली-गंभीरची टाळाटाळ अन् रोहित शर्माचंही मौन, सराव सत्रात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.