दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
IND vs SA दुसरा एकदिवसीय सामना: रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका (Ind vs SA 2nd ODI) एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडियाने 358 धावांचा डोंगर (Team India) रचला. भारताच्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकांमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इतके कमकुवत ठरले की सामना निसटला आणि दक्षिण अफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला. भारताच्या या पराभवानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. 5 खेळाडूंमुळे भारताचा पराभव झाला.
दक्षिण आफ्रिकेने दुसरी वनडे ४ विकेटने जिंकली.
मालिका १-१ अशी बरोबरीत राहून आम्ही विझागला जाऊ.
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rGOhm95NnI
— BCCI (@BCCI) ३ डिसेंबर २०२५
1. यशस्वी जैस्वाल- (Yashasvi Jaiswal)
दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल चांगली सुरुवात करू शकला नाही आणि लवकर बाद झाला. तसेच अँडम मारक्रमचा सोपा झेल सोडल्यानंतर क्षेत्ररक्षणातही यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करु शकला नाही. अँडम मारक्रम शतक ठोकले आणि सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. त्यामुळे यशस्वी जैस्वालने सोडलेला झेल भारतासाठी महागडा ठरला.
2. वॉशिंग्टन सुंदर- (Washington Sundar)
वॉशिंग्टन सुंदरकडून संघाला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदरने 1 धाव केली. तर 4 षटकांत 28 धावा दिल्या आणि एकही विकेट पटकावली नाही. तसेच वॉशिंग्टन सुंदरने टोनी डी झोर्झीचा एक महत्त्वाचा झेलही सोडला. या अपयशामुळे मधल्या षटकांत भारताचे मोठे नुकसान झाले.
3. प्रसिद्ध कृष्ण- (प्रसिद्ध कृष्ण)
प्रसिद्ध कृष्णाने 8.2 षटकांत 85 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रसिद्ध कृष्णच्या गोलंदाजीवर प्रचंड धावा केल्या आणि भारत दबाव राखण्यात अपयशी ठरला. शेवटच्या षटकांमध्येही प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी नियंत्रणात नव्हती.
4. कुलदीप यादव- (कुलदीप यादव)
कुलदीप यादवनेही निराशा केली. कुलदीप यादवने 10 षटकांत 78 धावा दिल्या, तर कुलदीप यादवला एकही विकेट पटकावता आली नाही.
५. रोहित शर्मा-(रोहित शर्मा)
रोहित शर्मा फक्त 14 धावांवर बाद झाला. फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली होती आणि टीम इंडियाला रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्मा लवकर बाद झाल्यामुळे मधल्या फळीवर दबाव आला.
एडन मार्करामचे दमदार शतक – (भारत वि एसए एडन मार्कराम)
भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आफ्रिकेनं 26 धावांवर डिकॉकच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा 46 धावा करुन बाद झाला. डेवाल्ड ब्रेविसनं 54 धावा केल्या. अँडम माक्रमनं 110 धावा केल्या. तर, ब्रीत्झकेनं 68 धावा केल्या. बॉश आणि केशव महाराज यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामर्तब केलं. भारताकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक धावा दिल्या. तर 2 विकेट्सही घेतल्या.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.