दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली; ऋषभ पंत टीम इंडियाचा नवा कर्णधार! किती वाजता सुरू होणार सामना?

India vs South Africa 2nd Test Day1 Live Score Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या रंगात आली आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. विशेष म्हणजे, टीम इंडिया या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, भारतावर 25 वर्षांनंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावण्याचे सावट आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताला 30 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

ऋषभ पंत टीम इंडियाचा नवा कर्णधार

या निर्णायक सामन्यात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल उपलब्ध नाहीत. पहिल्या सामन्यात त्याच्या मानेला दुखापत झाली होती, त्यामुळे तो या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंत हा कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व करणारा 38वा खेळाडू ठरला असून, एमएस धोनीनंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय विकेटकीपर टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मैदानात उतरतो आहे.

गुवाहाटी कसोटीच्या टाइमिंगमध्ये बदल

गुवाहाटी कसोटीसाठी सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सामना सकाळी अर्धा तास लवकर म्हणजे 9 वाजता सुरू होईल.

  • पहिला सत्र : सकाळी 9 ते 11
  • टी ब्रेक : 20 मिनिटे
  • दुसरा सत्र : 11:20 ते 1:20
  • लंच ब्रेक : 40 मिनिटे
  • तिसरा सत्र : दुपारी 2 ते 4

Comments are closed.