टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; रोहित-विराट बदला घेणार? थोड्याच वेळात नाणेफेक, जाणून घ्या सर्वकाह

India vs South Africa 3rd ODI Live Cricket Score Update : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना विशाखापट्टणममध्ये रंगत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला होता. मात्र रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला 4 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि विजेत्याचा निर्णय आजच्या सामन्यावर अवलंबून आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 0-2 ने गमावल्यानंतर ही वनडे मालिका टीम इंडियासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आजचा सामना हरल्यास कसोटीनंतर वनडे मालिकाही भारताच्या हातीतून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडिया विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिका आपल्या नावे करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.

Comments are closed.