प्रसिद्ध कृष्णा अन् हर्षित राणाला धुतले; पण तरीही तिसऱ्या वनडे सामन्यात दोघांना खेळवावचं लागणार


भारत विरुद्ध एसए तिसरी वनडे: भारत आणि दक्षिण अफ्रिका (Ind vs SA) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर काल मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेने (India vs South Africa) भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. यामुळे आता मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आगामी तिसरा एकदिवसीय सामना भारत आणि दक्षिण अफ्रिकेसाठी ‘करो या मरो’चा मुकाबला असणार आहे. कारण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जो संघ जिंकेल, तो मालिकाही जिंकणार आहे.

रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका (Ind vs SA 2nd ODI) एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडियाने 358 धावांचा डोंगर (Team India) रचला. भारताच्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकांमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इतके कमकुवत ठरले की सामना निसटला आणि दक्षिण अफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला. दक्षिण अफ्रिकेने भारताच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणाचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध कृष्णा आन हर्षित राणाला धुडले धुतले- (प्रसीध कृष्ण हर्षित राणा)

प्रसिद्ध कृष्णाने 8.2 षटकांत 85 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रसिद्ध कृष्णच्या गोलंदाजीवर प्रचंड धावा केल्या आणि भारत दबाव राखण्यात अपयशी ठरला. शेवटच्या षटकांमध्येही प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी नियंत्रणात नव्हती. तर हर्षित राणाने 10 षटकांत 70 धावा देत एक विकेट घेतली. फिरकीपटू कुलदीप यादवचीही गोलंदाजी चांगली राहिला नाही. कुलदीप यादवने 10 षटकांत 78 धावा देत एक विकेट पटकावली.

प्रसिद्ध कृष्णा अन् हर्षित राणाला तिसऱ्या वनडे सामन्यातही खेळावावं लागणार- (Ind vs SA 3rd ODI)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर रोजी खेळवण्यात येईल.  या सामन्यात खराब गोलंदाजी केल्यानंतरही प्रसिद्ध कृष्णा अन् हर्षित राणाला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करावं लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात एकूण तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे नितीश कुमार रेड्डीचा, परंतु विशाखापट्टणममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. परिणामी, सर्व संघ फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांवर जास्त अवलंबून असतात. त्यामुळे टीम इंडिया संघात कोणतेही बदल न करता तिसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे इच्छा असूनही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार केएल राहुलला प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणाला संघात खेळवावे लागेल.

वनडे मालिकेसाठी संपूर्ण भारतीय संघ- (Team India Full Squad Against SA)

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

संबंधित बातमी:

IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव

आणखी वाचा

Comments are closed.