भारतानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जसप्रीत बुमराह संघाबाहेर, सूर्यकुमार यादवनं कारण स

धर्मशाळा: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील  तिसऱ्या टी 20 सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल केल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली. अक्षर पटेलची प्रकृती बरी नसल्यानं तो हा सामना खेळत नाही. याशिवाय जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळं घरी परतल्यानं हे दोन बदल भारताच्या संघात करण्यात आल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली. कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना संघात स्थान दिल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली.

भारताचा संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, ओटोनिल बार्टमन.

बातमी अपडेट होत आहे…

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.