बुमराह, गिल OUT…; द. अफ्रिकेविरुद्ध आज चौथा टी-20 सामना, अशी असेल टीम इंडियाची Playing XI

Ind vs SA 4th T20 Team India Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज खेळवण्यात येणार आहे. लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा सामना रंगेल. सध्या भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून आज दक्षिण अफ्रिकेचा (Ind vs SA 4th T20) पराभव करुन मालिका जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल.

खेळपट्टी कशी असेल? (Ind vs SA 4th T20 Pitch Report)

एकाना खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते, परंतु वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये काही मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 175 धावा आहे. अनेक संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. कारण दुसऱ्या डावात दव पडतो. क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स आणि एडेन मार्कराम हे दक्षिण आफ्रिकेचे सर्वात मजबूत खेळाडू आहेत. मुल्लानपूरमधील पहिला सामना गमावल्यानंतर, डी कॉकच्या धमाकेदार खेळीमुळे आफ्रिकन संघाने पुनरागमन केले. धर्मशाळेतील तिसऱ्या सामन्यात एडेन मार्करामने शानदार अर्धशतक झळकावले होते.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल बाहेर- (India vs South Africa)

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel) दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ असल्यामुळे अक्षर पटेलला मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अक्षर पटेलच्या जागी आता अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा (Shahbaz Ahmed) समावेश करण्यात आला आहे. (Ind vs SA 4th T20 Match)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ: (Team India Squad Ind vs SA T20)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद.

चौथ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI: (भारत वि एसए 4 था T20 प्लेइंग इलेव्हन)

सूर्यकुमार यादव (कर्णधर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसान, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेट), वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.

संबंधित बातमी:

Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी

आणखी वाचा

Comments are closed.