Ind vs SA: लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ घेणार मोठे निर्णय! 'हे' 6 खेळाडू होणार बाहेर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट झाला आहे. आफ्रिकन संघाने भारताचा 2-0 असा धुव्वा उडवला. कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला आणि गुवाहाटीत 408 धावांनी भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव दिला. या मालिकेत काही खेळाडूंचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आणि त्यामुळे आता पुढील कसोटी मालिकेसाठी त्यांना कदाचित भारतीय संघात स्थान मिळणार नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे काही खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले. ध्रुव जुरेलने दोन सामन्यांत केवळ 7.5 च्या सरासरीने 29 धावा केल्या, तर केएल राहुलने 2 सामन्यांत फक्त 68 धावा जोडल्या. रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांचं प्रदर्शनही अत्यंत निराशाजनक राहिलं. हे खेळाडू चांगलं प्रदर्शन करत असते, तर दोन्ही सामन्यांचा निकाल कदाचित वेगळा दिसला असता. याशिवायही काही खेळाडूंनी निराशा केली असून त्यांचं संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.