भारतीय फलंदाज करणार पलटवार? तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात सुरू

सामन्याच्या पहिल्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, खेळ थांबला तेव्हा सहा बाद २४७ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने सहा बादवर खेळ सुरू केला आणि सेनुरन मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना रडवलं. काइल व्हेरेन अर्धशतक हुकले असले तरी, मुथुस्वामीने 109 धावा केल्या. त्यानंतर मार्को यान्सनने 93 धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Comments are closed.